Header Ads

New Marathi Story - New Story - धाडशी मुलगा

धाडशी मुलगा 


    एक मुलगा काशीत हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत होता. त्याचे गाव काशीहून आठ मैल दूर होते. तो दररोज तेथून पायी चालत येत असे आणि रस्त्यात जी गंगा नदी वाहते ती पार करून शालेत जात असे. 

    त्या काळी गंगा पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत असत. दोन पैसे येण्याचे आणि दोन पैसे जाण्याचे, एकूण चार पैसे म्हणजे पूर्वीचा एक आना. महिन्याचे जवळ जवळ दोन रुपये झाले. जेव्हा एक तोळा सोन्याचं भाव शंभर रुपयांपेक्षाही कमी होता. तेव्हाचे दोन रुपये आत्ताचे पंचवीस रुपये होतील. 

    त्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर जास्त भर पडू नये म्हणून एक पैसासुध्दा आई वडिलांकडे मागितला नाही. त्याने पोहणे शिकून घेतले. उन्हाळा असो, पावसाळा असो कि हिवाळा असो, पोहून गंगा पार करून शाळेमध्ये जाणे, हा त्याचा दिनक्रम झाला. अशा प्रकारे कितीतरी महिने निघून गेले. 

    एकदा पौष महिन्याच्या थंडीत या मुलाने सकाळी शाळेत जाण्यासाठी गंगेत उडी मारली. पोहत-पोहत तो नदीच्या मध्यभागी आला. एका नावेत काही यात्रेकरू नदी पार करीत होते. त्यांनी पहिले कि लहानसा मुलगा आता बुडून मरेल. ते त्याच्या जवळ नाव घेऊन गेले आणि हात त्याला नावेत खेचून घेतले. त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती किंवा चिंतेची छटा अजिबात नव्हती. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. इतका लहान आहे आणि इतका धाडशी? ते म्हणाले "तू आता बुडून मेळा असता तर? असे धाडस करू नये." 

    तेव्हा तो मुलगा म्हणाला, "धाडस तर केलेच पाहिजे. जीवनात अनेक अडचणी संकटे येतील. त्यांना पायदळी तुडवण्यासाठी धाडस तर पाहिजेच! जर आत्तापासून धाडस अंगी बाळले नाही, तर जीवनात मोठमोठी कार्ये कशी करू शकेन?" 

    लोकांनी विचारले, "ह्यावेळी पोहायला कशाला निघालास? दुपारी अंघोळीला आला अस्तास?" 

    मुलाने उत्तर दिले, "मी अंघोळ करण्यासाठी नदीत उतरलो नाही. मी तर शाळेत चाललो आहे." 

    "होडीत बसून गेला अस्तास!" 

    "रोजचे चार पैसे येण्या जाण्यासाठी लागतात. माझ्या गरीब आई वडिलांवर मला भर टाकायचा नाही. मला तर स्वतः च्या पायांवर उभे राहायचे आहे. माझा खर्च वाढला तर माझ्या आई वडिलांची चिंता वाढेल त्यांना घर चालवणे कठीण होऊन जाईल." 

    लोक त्याच्याकडे आदराने पाहताच राहिले. तोच धाडशी मुलगा पुढे भारताचं पंतप्रधान बनला. 

    तो मुलगा कोण होता माहित आहे? ते होते लाल बहाद्दूर शास्त्री! शास्त्रीजी पदावर सुध्दा सत्यता, धाडस, सरळपणा, प्रामाणिकपणा, साधेपणा, देशप्रेम इ. सदगुण आणि सदाचाराचे मूर्तिमंत स्वरूप होते. असे महापुरुष भले थोडा काळच राज्य करतात, पण एक जनमानसावर पडून जातात! 


    बोध- कोणतेही काम हिम्मत व धाडसाने करा ते निश्चित पूर्ण होते. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.